या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळणार ! नवीन शासन निर्णय पहा

Nuksan Bharpaai District List 2024:सन २०२२ च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे (अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील) झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत.

सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील सततच्या (अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील) पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना, वर नमूद अ.क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण रु.१५००.०० कोटी (अक्षरी रुपये पंधराशे कोटी फक्त) इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली होती.

शासन निर्णय येथे क्लिक करून डाऊनलोड करा

तद्नंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसिल कार्यालयाकडून अचूक परगणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथमतः डिबीटी प्रणालीवर उशिरात उशिरा दि.२८.०२.२०२४ पर्यंत भरुन घ्यावी. त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे. याबाबतची माहिती दि.२९.०२.२०२४ पर्यंत ई-मेलव्दारे नोंदवावी अशा सूचना दि.२६.०२.२०२४ च्या पत्राव्दारे सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.

तद्नंतर दि.०५.०३.२०२४ च्या पत्रान्वये पुन्हा ज्यादा निधीच्या मागणीबाबत दि.११.०३.२०२४ पर्यंत ईमेलव्दारे नोंदविणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी, अहमदनगर, परभणी, अमरावती व वाशिम यांचेकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला https आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrinews